आयव्हरी कोस्टमधील अबीदजॅन शहरात फटाक्यांच्या आतषबाजी दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ६० जणांचा मृत्यू झाला.
अबीदजॅन – आयव्हरी कोस्टमधील अबीदजॅन शहरात फटाक्यांच्या आतषबाजी दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ६० जणांचा मृत्यू झाला. शहरातील फेलिक्स बोईगनी स्टेडियमजवळ ही दुर्घटना घडली.
फटाक्यांच्या आतषबाजी पाहण्यासासाठी येथे मोठया संख्येने गर्दी जमली होती. चेंगराचेंगरीत ६० जणांचा मृत्यू झाला असून, २०० जण जखमी झाले आहेत असे बचाव पथकातील अधिका-यांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
मंगळवारी सकाळी घटनास्थळी रक्ताचे डाग आणि तुटलेल्या चप्प्लांचा खच पडला होता अशी माहिती वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने दिली. सरकारी अधिकारी तसेच बचाव आणि सुरक्षा पथक घटनास्थळावर आहे.