गेल्या दहावर्षातील सर्वात मोठ्या हिमवर्षावामुळे जपानमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर एक हजार २००हून अधिक जण जखमी झाले आहेत.
टोकियो– गेल्या दहावर्षातील सर्वात मोठ्या हिमवर्षावामुळे जपानमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर एक हजार २००हून अधिक जण जखमी झाले आहेत. राजधानी टोकियोमध्ये १०.६ इंच हिमवर्षाव झाल्याची नोंद हवामान खात्याने म्हटले आहे. शहरात गेल्या ४५ वर्षातील सर्वाधिक हिमवर्षावर झाल्याचे अधिका-यांनी सांगितले.
या हिमवर्षावामुळे देशातील तब्बल १३ मिलीयन लोकांना फटका बसला आहे. टोकियो शहरातील २० हजार घरांमध्ये वीजपुरवठा खंडीत आहे. तर ४००हून अधिक देशांतर्गत विमानउड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.