ठाणे आणि जळगाव अशा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये धावत्या रेल्वेतून फेकल्यामुळे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
ठाणे / जळगाव- ठाणे आणि जळगाव अशा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये धावत्या रेल्वेतून फेकल्यामुळे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
ठाण्यातील कोपरी पूल ते ठाणे रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या लोकलमधून गौरव पुंजवानी या तरुणाला फेकून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गौरवने पाकीट चोरीला विरोध केला. त्यामुळे चोरट्यांनी त्याला धावत्या गाडीतून धक्का मारत बाहेर फेकून दिले. जखमी गौरवला स्थानिकांनी जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे.
तर दुसरीकडे, सहप्रवासी तरुणांनी १८ वर्षीय विद्यार्थ्याला धावत्या गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसमधून बाहेर फेकल्याचा प्रकार जळगावमध्ये घडला आहे. ही घटना गुरुवारी पाळधीजवळ धरणगाव- चावलखेडा स्थानकादरम्यान घडली.
भूषण संजय भदाणे (१८) असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेत त्याला गंभीर इजा झाली असून, त्याला उपचारासाठी जळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.