युक्रेनमध्ये गेले तीन महिने सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलन करणा-या नागरिकांनी शनिवारी राजधानी किव्ह ताब्यात घेतली आहे.
किव्ह- युक्रेनमध्ये गेले तीन महिने सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलन करणा-या नागरिकांनी शनिवारी राजधानी किव्ह ताब्यात घेतली आहे. यामुळे अध्यक्ष व्हिक्टर यानूकोव्हायच राजधानी सोडावी लागली आहे.
शुक्रवारपासूनच शहरातील स्वातंत्र्य चौकात आंदोलन करणा-यांनी राजीनामा देण्याची घोषणा देण्यास सुरवात केली होती. आंदोलकांनी शनिवारी अध्यक्षांचे कार्यालय आणि निवासस्थान ताब्यात घेतले. दरम्यान यानूकोव्हायच यांचे समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार अध्यक्ष खारकिव्ह या शहराच्या भेटीला गेले आहेत. युक्रेनमधील या भागात यानूकोव्हायच यांना मोठ्या प्रमाणात समर्थन आहे.
युक्रेन देशात सध्या दोन विचार प्रवाह आहेत. देशातील एका भागातील नागरिकांनी युरोपमध्ये सहभागी व्हावी अशी मागणी करत आहेत. तर दुस-या भागातील नागरिक रशियाच्या बाजूने आहेत. आंदोलक आणि पोलिस यांच्यात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनात १००हून अधिक जण ठार झाले आहेत.