तळकोकणात गेल्या दोन दिवसांपासून धुवांधार पाऊस कोसळत असून करूळ घाटात रविवारी रात्री दरड कोसळली. गगनबावडय़ापासून २ किलोमीटर अंतरावर ही दरड कोसळली. भुईबावडा घाटातही पडझड सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
सिंधुदुर्ग – तळकोकणात गेल्या दोन दिवसांपासून धुवांधार पाऊस कोसळत असून करूळ घाटात रविवारी रात्री दरड कोसळली. गगनबावडय़ापासून २ किलोमीटर अंतरावर ही दरड कोसळली. भुईबावडा घाटातही पडझड सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
करुळ मार्गावरील वाहतूक भुईबावडा मार्गे वळविण्यात आली. सोमवारी दुपारी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर आलेली दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. रविवारी राञी भुईबावडा घाटातही एक-दोन ठिकाणी दगड रस्त्यावर आले होते. वाहनचालकांनी दगड बाजूला करुन वाहतूक सुरू केली आहे. एकंदरीत दोन्ही घाटमागार्ची अवस्था गंभीर असून पावसाळा वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
शनिवारी व रविवारी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. विशेषत: भुईबावडा व करूळ घाटमार्गात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. करुळ घाटमार्गात गगनबावडय़ापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन खबरदारी म्हणून मोठया अवजड वाहतूक भुईबावडा घाटमागार्ने वळवली. सोमवारी दुपारी सार्वजनिक बाधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर आलेली दरड हटवून एकेरी वाहतूक सुरू केली. दुपारी उशिरापर्यत दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. यावेळी पोलिस निरीक्षक विश्वजीत बुलबुले, पोलिस कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रव्हठकर, शाखा अभियंता मोरजकर उपस्थित होते.