गेले तीन वर्षे केवळ देवाचा धावा करण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच नव्हते. पण एकेदिवशी देवदुताप्रमाणे युवा नेते नितेश राणे यांच्यापर्यंत त्याची व्यथा पोहोचली आणि ..
सिंधुदुर्ग- घरची स्थिती गरिबीची, त्यात पॉवर टिलरने शेती करताना पाय गेला. शेती करण्यासाठी उभे राहायचे कसे? हा एकीकडे प्रश्न. तर दुसरीकडे पाऊल पुढे कसे टाकायचे, ही विवंचना. गेले तीन वर्षे केवळ देवाचा धावा करण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच नव्हते. पण एकेदिवशी देवदुताप्रमाणे युवा नेते नितेश राणे यांच्यापर्यंत त्याची व्यथा पोहोचली आणि पुढच्या काही दिवसांतच त्याला पाऊल पुढे टाकण्यासाठी भक्कम आधारही मिळाला. अपंगत्वाचे जिणे जगणा-या या शेतक-याला आत्मविश्वासाचे एक पाऊल मिळाले. बाव, तालुका कुडाळ येथील दर्शन बावकर या शेतक-याच्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग..
तीन वर्षापूर्वी पॉवर टीलरच्या एका अपघातात त्याला पाय गमवावा लागला. कुबडीच्या सहाय्याने अपंगत्वाचे जिणे जगणा-या दर्शनला नशिबाला दोष देण्यापलिकडे काहीच करता येत नव्हते. नवीन पाय बसवायचा तर येणारा खर्च परवडणारा नव्हता.
त्याच्या या दु:खाची माहिती गाव भेटीच्या एका कार्यक्रमात नितेश राणे यांच्या कानावर आली आणि तातडीने त्यांनी दर्शन यांना मदतीचा हात दिला. त्यांच्या प्रयत्नातून कृत्रिम पाय बसविण्याची शस्र्क्रिया यशस्वी झाली आणि दर्शन आनंदित झाला.
पुन्हा एकदा त्याच क्षमतेने तो शेतात जाऊ शकला नाही तरी आपल्या पायावर उभा राहण्याचा आत्मविश्वास त्याला मिळाला. याबद्दल नितेश राणे यांना धन्यवाद देतो, अशा दर्शन यांनी भावना व्यक्त केल्या. अलीकडेच त्याच्या पायावर मुंबई येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या पायाला जयपूर फूट बसवण्यात आला आहे.