‘डायन पोस्ट’ हे हॉर्न्सवॉगलचं खरं नाव आहे. तो अमेरिकन कुस्तीपटू आहे. तो सर्वात शेवटचा क्रुसवेट चॅम्पियन आहे. त्याने काही काळ रॉचा व्यवस्थापक म्हणूनही वर्षभर काम केलं.
लिटल बास्टर्ड, हॉर्न्सवॉगल मॅकहॅन, शॉर्टस्टॅक या नावांनीही तो कुस्ती खेळला आहे. तो डब्लूडब्लूइमधल्या काही मोजक्या बुटक्या खेळाडूंपैकी आहे. त्याची उंची केवळ चार फूट पाच इंच इतकी आहे. २९ मे, १९८६ रोजी त्याचा जन्म झाला. फिनले यांच्याकडून त्याने कुस्तीचं शिक्षण घेतलं. २००४ साली त्याने कुस्तीच्या क्षेत्रात प्रवेश केला. डब्लूडब्लूइमध्ये दाखल होण्यापूर्वी त्याने एनडब्लूए विस्कॉन्सिन एक्स डिव्हिजन चॅम्पियनशिपसुद्धा जिंकली होती. तर डेविन डायमंड याच्याबरोबर त्याने एसएसडब्लू टॅग टीम चॅम्पियनशिप जिंकली होती.
२६ मे रोजी स्मॅकडाउनमध्ये तो पहिल्यांदा टीव्हीवर झळकला. मधला काही काळ तो कुस्ती खेळत नव्हता. परतल्यानंतर त्याने द ग्रेट खली आणि नटालया याच्याबरोबर टीम तयार केली. ‘लेप्रेचॉन – ओरिजिन’ या सिनेमात त्याने अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या सर्व भागांमध्ये त्याने रोबोटची भूमिका केली आहे. ‘मपेट्स’ या कठपुतळी बाहुल्या त्याला आवडतात. रॉमध्ये पहिल्यांदा मपेट्स आल्यानंतर तोही मपेट्स वापरू लागला. त्याच्याकडे स्वत:च्या काही कठपुतळी बाहुल्या आहेत. त्याने मपेट्सचे टॅटूसुद्धा काढले आहेत.