दाऊद इब्राहिम भारतात परतण्यास तयार होता, हे वृत्त निराधार असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
मुंबई- मुंबई १९९३ बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार आणि भारताला हवा असलेला मोस्ट वॉंटेड गुन्हेगार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतात परतण्यास तयार होता, हे वृत्त निराधार असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
मंगळवारी काही वर्तमानपत्रामध्ये दोन वर्षांपूर्वी दाऊद भारतात परतण्यास तयार होता असे वृत्त प्रसिध्द झाले आहे. हे वृत्त सुशीलकुमार शिंदे यांनी खोडून काढले आहे.
दाऊदकडून अशा प्रकारची कोणतीही विनंती करण्यात आली नव्हती. मी तेव्हा गृहमंत्री होतो. त्यामुळे हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.