Saturday, May 18, 2024
Google search engine
Homeमध्यंतरभन्नाटदुर्गसंवर्धनाचा जागर

दुर्गसंवर्धनाचा जागर

डोंगरभटक्यांचं सह्याद्रीतल्या गडकिल्ल्यांशी एक अतूट नातं तयार झालेलं असतं. त्याच जाणिवेतून आपला या ऐतिहासिक ठेव्याची जपणूक करण्याचं काम डोंगरभटक्यांच्या अनेक संस्था गेली ३०-४० वर्षे मोठया प्रमाणात काम करत असतात. या सर्वाच्या कामाची दखल घेतली जावी, त्यांना एकत्रित आणावं आणि आपल्या वैभवशाली अशा पुरातत्त्वाचा सांभाळ कसा करायचा याचं मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने दुर्गसंवर्धन ही १४व्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना राहणार आहे.

OLYMPUS DIGITAL CAMERAआपण डोंगरवेडे सह्याद्रीच्या डोंगर-द-यात, कडे-कपा-यात, राना-वनात मुक्त निसर्गाचा निखळ आनंद घेत मनसोक्त भटकंती करत असतो. अर्थातच सह्याद्रीचं अंतरंग असणा-या गडकिल्ल्यांशी आपला सर्वाचा निकटचा संबंध येतो.

किंबहुना गड-किल्ले हा आपल्या भटकंतीचा भागच असतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांतील गडकोटांचा अत्यंत खुबीने वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. कालौघात रणक्षेत्रं बदलली तसे हे गडकोट दुर्लक्षित होऊ लागले. १८१८ नंतर तर इंग्रजांनी जाणीवपूर्वकपणे या गडकोटांना उपेक्षेचे धनीच केले आहे.

मात्र डोंगरभटक्यांना या ऐतिहासिक ठेव्याची जाण आहे. त्यामुळेच गेल्या २५-३० वर्षापासून अनेक गिर्यारोहक, दुर्गप्रेमी गडकोटांच्या जतनासाठी आपापल्या परीने योगदान देत आहेत. त्यांच्या कामाला मर्यादा आहेत हे जरी मान्य केले तरी ऐतिहासिक जाणिवेपोटी, सामाजिक बांधिलकी जोपासत केले जाणारे हे काम कौतुक करण्यासारखेच आहे.

अर्थातच गरज आहे ती त्यांना प्रोत्साहन देत, संवर्धनाच्या या कामाला योग्य दिशा देण्याची. त्यांना एकत्रित आणण्याची आणि त्यातूनच या गडकिल्ल्यांच्या संवर्धनात एकसूत्रता आणण्याची, म्हणूनच महाराष्ट्रातील समस्त डोंगरभटक्यांची मांदियाळी असणारे हे गिरीमित्र संमेलन यावर्षी दिनांक ११ व १२ जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे संपन्न होणार आहे. १४ व्या गिरीमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ही ‘दुर्गसंवर्धन’ अशी ठेवण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे माजी संचालक डॉ. अरिवद जामखेडकर हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. तर महाराष्ट्राचे शालेय शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉ. गोरक्षनाथ देगलूरकर हे विशेष अतिथी असतील.

मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून संमेलनात अनेक व्याख्याने, परिसंवाद, खुली चर्चा, प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात पुरातत्त्व क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे, तर संमेलन स्थळी उपस्थित असणा-या केंद्र आणि राज्य पुरातत्त्व खात्याच्या संचालकांशी खुला संवाद साधता येईल.

गिर्यारोहकांच्या कामाला मर्यादा असल्या तरी ऐतिहासिक जाणिवेने, सामाजिक बांधिलकी जोपासत केल्या जाणा-या या कामाला पुरातत्त्व संवर्धनाचे तांत्रिक मार्गदर्शन मिळावे या हेतूनेच या वर्षीच्या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आखल्याचे आयोजकांनी नमूद केलं आहे.

संमेलनाच्या निमित्ताने दृक्श्राव्य सादरीकरण, अभ्यासू सादरीकरण, छायाचित्रण, प्रश्नमंजूषा, ट्रेकर ब्लॉगर आणि पोस्टर अशा अनेक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. दृक्श्राव्य सादरीकरण स्पध्रेसाठी पदभ्रमंती, गिरिभ्रमंती, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, हिमालयीन मोहिमा या विषयांवरील सादरीकरणे (ऑडिओ व्हिज्युअल अथवा फिल्मस) यासाठी ग्राह्य धरण्यात आली.

विजेत्यांना सन्मानचिन्हाबरोबरच विशेष आíथक प्रोत्साहन पारितोषक  देण्यात येणार आहे. छायाचित्र स्पध्रेसाठी प्रस्तरारोहण, हिमालयीन मोहिमा आणि डोंगरातील मानवी जनजीवन असे तीन गट करण्यात आले होते. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. तर भटकंतीविषयक प्रश्नमंजूषा ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष संमेलन स्थळी अशा दोन प्रकारे घेण्यात येणार आहे.

डोंगरभटकंतीचे अनुभव ब्लॉगच्या माध्यमातून मांडणा-यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पदभ्रमंती, गिरिभ्रमंती, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, हिमालयीन मोहिमा या विषयांवरील ब्लॉगर्सची स्पर्धा देखील घेण्यात आली. यंदाच्या वर्षी पोस्टर स्पर्धा ही नव्याने सुरू करण्यात आली. भटकंतीत सह्याद्रीत आढळणा-या शिल्पकलेवर आधारित पोस्टर्स या स्पर्धेसाठी मागवण्यात आली.

स्पर्धासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात आले नाही. १४ व्या गिरीमित्र संमेलनाचे आयोजन दुर्गविकास या संस्थेमार्फत करण्यात येत आहे. संमेलनाच्या अधिक माहितीसाठी WWW.GIRIMITRA.ORG ही वेबसाईट पाहावी अथवा ०२०-२५६८१६३१ / ९८३३३९४०४७ / ९९८७९९०३०० या क्रमांकांवर संपर्क साधावा.

स्पर्धेचे तपशील पोस्टर्स स्पर्धा

चार भिंतींच्या बाहेर भटकताना आपल्याला निसर्गाची जशी अनोखी रूपं पाहावयास मिळतात तसेच इतिहास काळातील मानवनिर्मित अलौकिक स्थापत्यरचनादेखील आढळतात. लेणी, मंदिरे, गड-किल्ल्यांवरील अनेक प्राचीन देवता, तटबंदीवरील अनोखी शिल्पे, कलाकुसर अशा मानवाच्या पुरातन कलाकृतींच्या असंख्य खुणा आपणास साद घालतात.

ही केवळ शिल्पच नसतात तर त्या असतात इतिहासाच्या पाऊलखुणा. त्यांच्या दिसण्याने आपण आपसूकच इतिहासाचा मागोवा घेऊ लागतो. कधी छायाचित्रणाच्या अंगाने तर कधी पुस्तकांतील संदर्भाच्या अनुषंगाने.

या वर्षी नव्याने सुरू करण्यात आलेली पोस्टर स्पर्धा ही याच इतिहासाच्या पाऊल खुणांचा मागोवा घेणारी आहे. सहयाद्रीतल्या कातळ शिल्पाच्या पाऊलखुणा या छायाचित्र आणि माहितीच्या माध्यमातून समर्पकपणे छापील पोस्टर स्वरूपात मांडायच्या आहेत.
कमाल पोस्टर आकार : ३६ इंच बाय २४ इंच
सविस्तर नियम आणि प्रवेश अर्जासाठी पाहा

अभ्यासपूर्ण दृक्श्राव्य सादरीकरण

आपल्यातील अनेक डोंगर भटके केवळ भटकत नाहीत तर आपल्या भटकंतीतून काही ना काही वेगळे ज्ञान प्राप्त करत असतात. आपल्या आवडीच्या विषयावर अधिकाधिक माहिती मिळवून ते स्वत:ला समृद्ध करत असतात. आपली हीच समृद्धी इतर डोंगर मित्रांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आम्ही या वर्षीपासून यासाठी खास वेळ देत आहोत.

यामध्ये किल्ले, प्रस्तरारोहण, हिमालयीन मोहिमा या विषयातील अभ्यासून सादरीकरण यामध्ये अपेक्षित आहे. केवळ मोहिमांची माहिती, ट्रेकचे वर्णन अपेक्षित नाही. महत्त्वाचे म्हणजे या सादरीकरणांची स्पर्धा नसेल. विषयाची व्याप्ती, त्यातील नावीन्य आणि मांडण्याची पद्धत या निकषावर सादरीकरण संमेलनात दाखवायचे की नाही हे ठरवले जाईल.

ग्राहय प्रवेशासाठी : विषयाला अनुसरून चित्रफिती, पॉवर पॉइट सादरीकरण इ.
संपर्क : राहुल मेश्राम : ९८३३३९४०४७/ ९९८७६४७६०७, अमित सामंत : ९८६९३३३२०२

दृक्श्राव्य सादरीकरण स्पर्धा

विषय : गिर्यारोहण, माऊंटन बाईंकिंग, प्रस्तरारोहण, दुर्ग.
ग्राहय प्रवेशासाठी : विषयातल्या अनुसरून चित्रफिती, पॉवर पॉइंट सादरीकरण इ.
कालमर्यादा : १५ मिनिटे

ट्रेकर्स ब्लॉगर्स स्पर्धा

ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धेस मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता या वर्षीही ट्रेकर्स ब्लॉगर्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी १३व्या गिरीमित्र संमेलनापासून ते प्रवेश अर्ज दाखल करेपर्यंतचा ब्लॉगवरील मजकूर ग्राहय धरण्यात येईल.

विषय : पदभ्रमंती, गिरीभ्रमंती, दुर्ग दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, हिमालयन ट्रेक / मोहिमा इ.

भाषा : मराठी

निकष : विषय मांडणी, भाषा, ताजेपणा, लिखाणातील तांत्रिक अचूकता.

संपर्क : सुहास जोशी ९८३३०६८१४०

छायाचित्रण स्पर्धा

गेल्या दोन वर्षाप्रमाणेच यंदाही छायाचित्रण स्पर्धा ही पूर्णत: ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. फरक इतकाच या वर्षी काही ठरावीक विषय यासाठी निवडण्यात आले आहेत. जेणेकरून त्याच विषयासंदर्भात चांगली छायाचित्रे जमा होतील आणि दस्तऐवजीकरण होईल.

स्पर्धेचे विषय : १. डोंगरातले मानवी जनजीवन, २. हिमालयीन मोहिमा.
संपर्क : राजस देशपांडे ९६६४७८२५०३
सविस्तर नियम आणि प्रवेश अर्जासाठी पाहा  : www.grimitra.org

प्रश्नमंजूषा

मागील तीन संमेलनांपासून सुरू केलेल्या या उपक्रमाने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. सदर प्रश्नमंजूषा दोन टप्प्यात होईल. ऑनलाईन प्रश्नमंजूषा १ जून २०१४ पासून सुरू होईल. ऑनलाईन क्विझमधून ५ आणि नोंदणी करणादरम्यान घेतलेल्या स्पॉट क्विझमधून निवडलेले ५ आणि लकी ड्रॉमधून १ अशा एकूण ११ स्पर्धकांची अंतिम स्पर्धा संमेलनाच्या दिवशी घेण्यात येईल. ऑनलाईन प्रश्नमंजूषेसाठी www.grimitra.org वर लॉगईन करा.

ई-स्मरणिका

नेहमीप्रमाणे यामध्ये गिरीमित्र सन्मान, मध्यवर्ती संकल्पनेवरील लेख, माहितीपर लेख देणार आहोत. तसेच महाराष्ट्रातील गिर्यारोहण संस्थांची माहिती आपण देणार आहोत. त्यासाठी आपल्या गिर्यारोहण संस्थेचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल, संकेतस्थळ इ. माहिती पाठवावी. ई-स्मरणिकेसाठी मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून लेख पाठवता येतील. ई-स्मरणिका फक्त www.grimitra.org या संकेतस्थळावर डाऊनलोडसाठी उपलब्ध असेल.
संपर्क : grimitra.sammelan@gmail.com

मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून १४व्या गिरीमित्र संमेलनात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांची सर्वसाधारण रूपरेषा पुढीलप्रमाणे –

दिनांक ११ जुलै २०१५ : सायंकाळी ५.०० ते ९.००.

दृक्श्राव्य सादरीकरणातील निवडक सादरीकरणे.

पुरातत्त्व क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ व्यक्ती आणि संबंधित सरकारी खात्यातील अधिका-यांबरोबर खुला संवाद.

दिनांक १२ जुलै २०१५ : सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.००.

गिरीमित्र सन्मान प्रदान सोहळा.

मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रम.

पुरातत्त्व क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ व्यक्ती आणि संबंधित सरकारी खात्यातील अधिका-यांचे मार्गदर्शन.

दृक्श्राव्य सादरीकरणातील पारितोषकप्राप्त सादरीकरणे.
गिर्यारोहण वार्तापत्र (मागील वर्षातील ठळक घडामोडी)

प्रश्नमंजूषा.

अभ्यासपूर्ण दृक्श्राव्य सादरीकरण.
पोस्टर आणि छायाचित्र स्पर्धा निवडक कलाकृती प्रदर्शन.
ट्रेकर्स ब्लॉगर्स, छायाचित्रण, पोस्टर स्पर्धा पारितोषक वितरण.
गिर्यारोहण मोहीम प्रोत्साहनपर आर्थिक मदत वितरण.

संमेलन प्रवेशिका देणगी मूल्य रु. ५००/- फक्त (दिनांक ११ जुलै चहा, भोजन, दिनांक १२ जुलै चहा, नाष्टा, भोजन) संमेलनात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. संमेलनस्थळ केवळ ५०० डोंगरभटक्यांना सामावून घेऊ शकते. त्यामुळे संमेलन प्रवेशिका वितरणात प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य राहील. १४व्या गिरीमित्र संमेलनाचे आयोजन ‘दुर्गविकास’ या संस्थेमार्फत करण्यात येत आहे.

संमेलन प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण

महाराष्ट्र सेवा संघ : जवाहरलाल नेहरू मार्ग, अपना बाजारच्या वर, मुलुंड (प.) मुंबई ४०००८० दूरध्वनी : ०२२- २५६८१६३१
वेळ : सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार ते शनिवार : सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३०, रविवार : सकाळी १०.३० ते १२.३०

महत्त्वाच्या सूचना

मुंबई बाहेरील प्रतिनिधींची ११ जुलै रोजी राहण्याची व्यवस्था महाराष्ट्र सेवा संघ, मुंबई येथे करण्यात आली आहे. त्यासाठी पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.
संमेलनाच्या निमित्ताने घेतल्या जाणा-या स्पर्धा सर्वासाठी खुल्या आहेत. संमेलनात सहभागी होण्यासाठी देणगी प्रवेशिका घेणे बंधनकारक राहील.
संमेलनाची साप्ताहिक बैठक दर मंगळवारी ७.३० वाजता महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे होत असते. या बैठकीला गिरीप्रेमी उपस्थित राहू शकतात. त्यांनी त्यांच्या काही सूचना, नवे विषय असतील तर संस्थेला कळवावे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट