भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमधील न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यूयॉर्क – भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्मधील न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. व्हिसा घोटाळ्याप्रकरणी देवयानी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला खटला न्यायालयाने रद्द केला आहे.
देवयानी खोब्रागडे यांना व्हिसा घोटाळ्या प्रकरणी न्यूयॉर्कमधून अटक करण्यात आली होती.त्यानंतर देवयानी यांच्याविरोधात अमेरिकन न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. गुरुवारी न्यायालयाने त्यांच्यावरील खटला रदद् करण्याबरोबरच त्यांच्यावर लावलेले आरोप आणि जामिनासंबधित अटीही रद्द केल्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी १२ डिसेंबरला व्हिसा घोटाळ्याप्रकरणी आरोपाखाली देवयांनी यांना न्यूयॉर्कमधून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप भारताने केला होता. त्यानंतर देवयानी यांची संयुक्त राष्ट्रात बदली करण्यात आली होती. देवयानी यांच्यावरील खटला रद्द झाल्याने उत्तम खोब्रागडे यांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच परराष्ट्र मंत्रालयाचे आभारही मानले.