देशभरात पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका या सर्व आपात्कालीन सेवांसाठी ११२ हा एकच आपात्कालीन क्रमांक वापरला जावा अशी शिफारस ट्रायने केली आहे.
नवी दिल्ली – देशभरात पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका या सर्व आपात्कालीन सेवांसाठी ११२ हा एकच आपात्कालीन क्रमांक वापरला जावा अशी शिफारस ट्रायने केली आहे.
अमेरिकेत ९११ हा क्रमांक आपात्कालीन सेवांसाठी वापरला जातो. त्याचप्रमाणे १००, १०१, १०२ आणि १०८ या क्रमांकाऐवजी ११२ हा एकच हेल्पालाईन क्रमांक वापरला जावा असे ट्रायने आपल्या शिफारशीत म्हटले आहे.
सध्या पोलीस सेवेसाठी १००, अग्निशमन सेवेसाठी १०१, रुग्णवाहिका सेवेसाठी १०२ आणि आपत्तीव्यवस्थापनासाठी १०८ हेल्पालाईन क्रमांक सुरु आहे.
मोबाईल अथवा लँडलाईनची आऊटगोईंग सर्व्हिस तात्पुरती बंद करण्यात आली असली तरी नागरिक त्यांच्या मोबाईलवरुन तसेच लँडलाईनवरुनही ११२ क्रमांकावर कॉल करु शकतात. तसेच या क्रमांकवर येणा-या एसएमएसनांही उत्तर दिले जाईल, असे ट्रायने यावेळी सांगितले.