आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिचा विवाह सोमवारी नाशिकमध्ये पार पडला.
नाशिक- आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिचा विवाह सोमवारी नाशिकमध्ये पार पडला. महेश तुंगार यांच्याशी कविताचा विवाह झाला.
महेश महाराष्ट्र वीजनिर्मिती कंपनीत मेकॅनिकल इंजिनीअर आहे. लग्नानंतरही विविध स्पर्धांमध्ये भाग घेणार असल्याचे कविताने सांगितले. लग्नाचा आपल्या करिअरवर कोणताही परिणाम नसल्याचे तीने स्पष्ट केले. देशासाठी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न असल्याचे कविताने सांगितले.