विदर्भाच्या नागपूर,गोंदिया आणि अकोला जिल्ह्याला गेल्या २४ तासांत पावसाने झोडपून काढले.
नागपूर – विदर्भाच्या नागपूर,गोंदिया आणि अकोला जिल्ह्याला गेल्या २४ तासांत पावसाने झोडपून काढले.
नागपूरमध्ये गेल्या २४ तासांमध्ये १४५.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गोंदियामध्ये १२५.६ आणि अकोलामध्ये १२४.५ मिमी पाऊस पडला आहे.
हवामानखात्याने दिलेल्या माहितीनुसार, याआधी नागपूरमध्ये शनिवारी रात्री १६०.६ मिमी पाऊस पडला होता. संपूर्ण जून महिन्यात १६५. ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे कोणतीही जिवीत अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, कोणतीही अनूचित घटना घडू नये यासाठी सर्व आपातकालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे.