नायजेरियातील मैदुगुरी शहरात एका महिला दहशवादीने केलल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात दहा जण ठार झाल्याची माहिती रेडकॉस संघटनेने दिली आहे.
मैदुगुरी– नायजेरियातील मैदुगुरी शहरात एका महिला दहशवादीने केलल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात दहा जण ठार झाल्याची माहिती रेडकॉस संघटनेने दिली आहे.
शहरातील एका गर्दीच्या बाजारपेठेत हा आत्मघाती हल्ला झाला. या बाजारपेठेत गेल्या वर्षी सुद्धा दोन वेळा महिला दहशवाद्यांनीच आत्मघाती स्फोट घडवून आणले होते.
शनिवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. मात्र या हल्ल्यामागे बोको हराम ही संघटना असल्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण बोको हरामकडून महिला दहशतवाद्यांचा वापर केला जात आहे. ही संघटना गेल्या सहा वर्षापासून तरुण महिला दहशतवाद्यांकडून आत्मघाती हल्ले घडवून आणत आहे.