नायजेरियात बोको हरम गटाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद केलेल्या गोळीबारात ४२ विद्यार्थी ठार झाले आहेत.
नायजेरिया- नायजेरियात बोको हरम गटाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद केलेल्या गोळीबारात ४२ विद्यार्थी ठार झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांशी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
नायजेरियातील योबे प्रांतात दहशतवाद्यांकडून शाळांवर अहोरात्र हल्ले सुरू आहे, अशी माहिती वैद्यकीय कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शीनी दिली. या हल्ल्यातून काही शिक्षक व विद्यार्थ्यांनी पळ काढल्याने ते बचावले आहेत. या हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी जोरदार शोधमोहीम राबवली आहे.