नायजेरियात बंदूकधारी व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात तीन गावांतील १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला.
कदुना – नायजेरियात बंदूकधारी व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात तीन गावांतील १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी ४०हूनही अधिक अज्ञात बंदूकधारी व्यक्तींनी उग्वार संकवाई, उग्वाम गता आणि छेनशी या गावातील लोकांवर गोळीबार केला. यामध्ये १००हून अधिक मृत्यूमुखी पडले तर काही जणांची घरेही जाळून टाकण्यात आली.
नायजेरियातील हल्ला झालेल्या या गावांमध्ये जमिनीच्या मुद्द्यावरुन सतत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. मात्र शुक्रवारी आणि शनिवारी झालेला हल्ला हा फार मोठा होता. या हल्ल्यातील जखमींची संख्याही मोठी आहे.