महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रमुख भूमिका बजावणारे आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष उद्योगमंत्री नारायण राणे यांचा कृतज्ञता सत्कार शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे.
कुडाळ- महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रमुख भूमिका बजावणारे आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष उद्योगमंत्री नारायण राणे यांचा कृतज्ञता सत्कार शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे.
हा सत्कार सोहळा कुडाळ येथे होणार असून सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्त्वशिलादेवी भोसले यांच्या हस्ते केला जाणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने राज्यघटनेचा अभ्यास करून समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे समाजातील आर्थिक मागास जनतेला फायदा होणार आहे. समाजाच्या हिताचा विचार करून राणे यांनी हे आरक्षण समाजाला मिळवून दिले आहे.
त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज आरक्षण उत्कर्ष समितीमार्फत राणे यांचा हा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.