सोळाव्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांची यादी निवडणूक आयोग रविवारी सायंकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवणार आहे.
नवी दिल्ली – सोळाव्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांची यादी निवडणूक आयोग रविवारी सायंकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवणार आहे.
निवडणूक आयोगाचे प्रमुख व्ही.एस.संपथ यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांचे मंडळ निवडून आलेल्या ५४३ खासदारांची यादी राष्ट्रपतींकडे सूपूर्द करणार आहेत.
या लोकसभा निवडणुकीत भाजपने २८२ जागांवर विजय मिळवला आहे तर काँग्रेसने ४४ त्यापाठोपाठ अण्णाद्रमुकने ३७ जागांवर विजय मिळवला आहे.
राष्ट्रपतींना नवनियुक्त खासदारांची यादी सोपविल्यानंतर सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला सुरवात होणार आहे.