योगेश मगर व सुरेश पाटील यांनी इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
अलिबाग-रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या निवडणुकीत १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तीन जागांसाठी उमेदवार नसल्यामुळे त्या रिक्त राहणार आहेत. उरलेल्या चार जागांसाठी ८ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीतून सुरेश पाटील यांनी माघार घेतली आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या २१ जागांसाठी ४० उमेदवारी अर्ज आले होते. ज्या मतदार संघातून निवडणूक लढवायची आहे, त्याच मतदारसंघातील सूचक व अनुमोदक नसल्यामुळे १४ जाणांचे अर्ज अवैध ठरले होते. त्यामुळे दोन मतदारसंघात उमेदवार उरले नाहीत. तर ६ मतदार संघातील ११ जागांकरीता विधीमान्य ११ उमेदवारच पात्र असल्यामुळे या सर्व ११ जागा बिनविरोध झाल्या.
डॉ. उदय जोशी यांच्या पॅनेलचे अॅड. जे. टी. पाटील, अलिबाग अॅड. सागर पाटील, अलिबाग, अॅड. संतोष पवार, अलिबाग, अॅड. के. एस. पाटील, पनवेल, हेमंत पाटील-उरण, प्रकाश चांदिवडे-कळंबोली, दिलीप पटेल-रेवदंडा, चंद्रकांत घोसाळकर -पाली, जगदीश कवळे-अलिबाग, श्यामकांत भोकरे-बोर्लीपंचतन, श्रीवर्धन, निजामुद्दीन कागदी-साई, माणगांव, हे बिनविरोध निवडून आले.
योगेश मगर-वेश्वी यांनी दोन मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरले होते. योगेश मगर व सुरेश पाटील यांनी इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे गिरीश तुळपुळे पॅनेलचे गणेश म्हात्रे-चिरनेर, उरण बिनविरोध निवडून आले. डॉ. उदय जोशी यांच्या पॅनेलचे सीताराम कावळे यांनी वसूल भागभांडवल व ठेवी ५ कोटींपेक्षा अधिक व १५ कोटींपेक्षा कमी असणाऱ्या पतसस्थांच्या मतदारसंघातून आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे या मतदारसंघातून डॉ. उदय जोशी यांच्या पॅनेलचे योगेश मगर व दिलीप जोशी-मुरुड हे बिनविरोध निवडून आहेत.
२१ पैकी ३ जागांसाठी उमेदवार नसल्याने त्या रिक्त राहणर आहेत. उरलेल्या १८ पैकी १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ४ जागांसाठी ८ मे रोजी निवडणूक होणार आहे. डॉ. जोशी पॅनलतर्फे महिला राखीव मतदारसंघातून कविता प्रविण ठाकूर-अलिबाग व उषा लक्ष्मण चांदगांवकर-रोहा, तर अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून संजय बाबूराव वानखेडे-िपपळभाट, अलिबाग व विशेष मागास मतदारसंघातून नरसिंह बाळकृष्ण मानाजी निवडणूक लढवित आहेत.
तुळपुळे पॅनलतर्फे महिला राखीव मतदारसंघातून मालती चंद्रकांत आंग्रे व मानसी मोहन कर्वे, तर अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून प्रकाश गणपत सोनवडेकर व विशेष मागास मतदारसंघातून दिलीप बाळू कांबळे निवडणूक लढवित आहेत.