पोलिसांच्या माहितीनुसार, हॉटेल प्रेसिंडटच्या व्यवस्थापकांकडून नियंत्रण कक्षाला याची माहिती देण्यात आली. रविवारी सकाळी ११ च्या दरम्यान त्यांची खोली उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पुणे – पत्नीच्या त्रासाला कंटाळून ‘ढोल ताशे’ मराठी चित्रपटाचे निर्माते अतुल बाजीराव तापकीर यांनी शनिवारी रात्री एरंडवणा परिसरातील हॉटेल प्रेसिडेंट येथे आत्महत्या केली. आत्महत्येसंदर्भात फेसबुकवर पोस्ट शेअर करून ही आत्महत्या केली आहे.
‘मी आता कायम स्वरुपी माझ्या आईसोबत राहणार याचा मला खूप आनंद आहे’, असे तापकीर यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. जागतिक मातृदिनाच्या पूर्वसंध्येलाच अचानक घडलेल्या या दु:खद घटनेने मराठी चित्रपट उद्योगाला हादरा बसला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हॉटेल प्रेसिंडटच्या व्यवस्थापकांकडून नियंत्रण कक्षाला याची माहिती देण्यात आली. रविवारी सकाळी ११ च्या दरम्यान त्यांची खोली उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, अतुल तापकीर यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर या संदर्भात पोस्ट टाकली होती. पत्नी प्रियंकाशी सतत होत असलेल्या वादाला आणि तिच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाइडमध्ये नोटमध्ये लिहिले आहे.अतुल यांच्या फेसबुक पोस्टवर नमूद केल्याप्रमाणे ‘ढोल ताशे’ चित्रपटामध्ये त्यांना मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते.
कर्जबाजारी झाल्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्या पत्नीच्या भावांनी त्यांना मारहाण केल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.
अतुल तापकीर यांचा ‘ढोल ताशे’ चित्रपट ३ जुलै २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता. जितेंद्र जोशी, हर्षिता भट्ट, अभिजित खांडकेकर अशा मोठय़ा कलाकारांनी चित्रपटात भूमिका केली आहे. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आणि अतुल तापकीर यांचे मोठे नुकसान झाले.