पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत, पूँछमधील नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला.
जम्मू – पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत, पूँछमधील नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला.
शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार करत उखळी तोफांचा मारा केला अशी माहिती वरिष्ठ लष्करी अधिका-याने दिली.
भारतीय जवानांनीही पाकिस्तानी सैन्याच्या या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या हद्दीतून काही दहशतवादी भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करणार असल्याची गुप्तचरांची माहिती आहे. या दहशतवाद्यांना भारतीय सीमेमध्ये घुसता यावे यासाठी हा गोळीबार सुरु आहे असे या लष्करी अधिका-याने सांगितले.
गेल्यावर्षी पाकिस्तानने वांरवार शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करुन, भारतीय चौक्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. या शस्त्रसंधींच्या उल्लंघनामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता.