रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाजवळ सोमवारी सकाळी आत्मघातकी तालिबानी दहशतवाद्याने बॉम्बस्फोट घडवून आणला.
इस्लामाबाद – रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाजवळ सोमवारी सकाळी आत्मघातकी तालिबानी दहशतवाद्याने बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात तेरा जणांचा मृत्यू झाला.
रविवारीच उत्तरपश्चिमेला असणा-या लष्करी कार्यालयाच्या आवारात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला होता. या स्फोटात २० जणांचा मृत्यू झाला होता. सलग दुस-या दिवशी दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केले आहे.
लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशव्दाराबाहेर आत्मघातकी दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बस्फोटात उडवून घेतले अशी माहिती पोलिस अधिकारी सरदार झुल्फीकार यांनी दिली. निवृत्त अधिका-यासह पाच जवानांचा या स्फोटात मृत्यू झाला. १८ जण स्फोटात जखमी झाले. हा आत्मघातकी हल्लेखोर सायकलवरुन आला होता. लष्कराच्या तपासणी चौकीजवळ येताच त्यांना स्फोट घडवून आणला.