मुंबई महापालिकेच्या हद्दीतील मागील दोन वर्षापासून रखडलेल्या २७४ पुलांचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल येत्या चार दिवसांत सादर केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच पुलांची दुरुस्ती व पुनर्बाधणीचा मुहूर्त ठरणार आहे.
मुंबई- मुंबई महापालिकेच्या हद्दीतील मागील दोन वर्षापासून रखडलेल्या २७४ पुलांचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल येत्या चार दिवसांत सादर केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच पुलांची दुरुस्ती व पुनर्बाधणीचा मुहूर्त ठरणार आहे.
अंधेरी दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शुक्रवारपासून रेल्वेच्या हद्दीतील पुलांची पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र पालिकेच्या हद्दीतील २७४ जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन त्याचा अहवाल मागील दोन वर्षापासून लटकला आहे. त्यामुळे या पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम रखडले आहे. अंधेरी दुर्घटनेनंतर पालिकेला जाग आली असून या पुलांचा अहवाल येत्या आठवडाभरात सादर करण्यासा़ठी पालिकेच्या पूल विभागाची धावपळ सुरू झाली आहे.
महापालिकेच्या अखत्यारित असलेले २७४ पुल हे जुने व काही ब्रिटीशकालीन आहेत. या पुलांची दुरुस्ती, पुनर्बांधणी करण्यासाठी पालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय पालिकेने २०१६ साली घेतला. त्यानुसार सर्वेक्षण करून स्ट्रक्चरल ऑडिटचे कामही सुरू केले. त्याचा अहवाल सहा महिन्यांत सादर केला जाणार होता. मात्र दोन वषार्नंतरही हा अहवाल लटकला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांत तीन कन्सलटन्ट कंपन्या नियुक्त करण्यात आल्या. किती पूल जुने आहेत, आतापयर्ंत कितीवेळा डागडुजी झाली, पुलाचे आयुर्मान आदी तपासणी करण्यात आली. यांतील ब्रिटिशकालीन पूल किती याची माहिती पालिकेला झाली. तपासणीच्या पहिल्या टप्प्यात सर्व पुलांचा आढावा घेण्यात आला. यांत कोणता पूल पाडणे आवश्यक आहे, किती पुलांची दुरुस्ती करावी लागणार आहे व कोणता नवीन पूल बांधावा लागणार आहे. हे ठरवण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा अहवालच अद्याप सादर झालेला नसल्याने पुलांच्या दुरुस्तीचे काम रखडले असल्याचे चित्र आहे. दरम्यान, अहवाल सादर झाल्यानंतर पुलांची दुरुस्ती, पुनर्बांधणीचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पूल विभागाच्या एका अधिका-यांनी दिली.