पुण्यात चोरीच्या संशयावरून पेट्रोल टाकून जाळलेल्या मुलाचा उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास मृत्यू झाला.
पुणे- पुण्यात चोरीच्या संशयावरून पेट्रोल टाकून जाळलेल्या मुलाचा उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास मृत्यू झाला. त्याच्यावर ससुन रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सावन धर्मा राठोड (१७) असे या मुलाचे नाव होते. तो पुण्यातील अलका टॉकीजच्या फुटपाथवर राहत असून भंगार गोळा करण्याचे काम करत होता. या प्रकरणी इब्राहिम शेख, इमरान तांबोळी (२८) आणि जुबरे तांबोळी (२६) यांना अटक करण्यात आली.
बुधवारी दुपारी सावन हा कसबा पेठ येथे उभ्या असलेल्या एका गाडीजवळ भंगार गोळा करत होता. मात्र, इब्राहिम, इमरान आणि जुबरे यांना तो गाडीची बॅटरी चोरत असल्याचा संशय आला. त्यामुळे या तिघानी त्याला मारहान केली आणि पेट्रोल टाकून जाळले.
यामध्ये सावन ६५ टक्के भाजला होता. त्याच्यावर ससुन रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.