राहुल गांधी यांचे अमेठीत महिला बचत गटांमार्फत महिलांच्या सबलीकरणासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहेत. महिला सबलीकरणाचे असे प्रयत्न मला माझ्याही मतदारसंघात करायला आवडतील, असे वक्तव्य भाजपचे सरचिटणीस वरुण गांधी यांनी केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. आपल्या विरोधी पक्षाच्या उपाध्यक्षांचे गुणगान जाहीरपणे केल्याने त्यांची आई मनेका गांधी यांनीही त्यांची कानउघडणी केली आहे. मात्र, वरुण गांधी यांनी स्वत:हून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. लोकसभेचा बिगुल वाजल्यानंतर लोकांच्या मनात आपल्याबद्दल आणि पक्षाबद्दल जागा निर्माण करण्याची स्पर्धा तीव्र झाली असताना वरुण गांधी यांच्या विधानाने सगळेच बुचकळयात पडले आहेत. भाजपमध्ये जे काही मोजके तरुण चेहरे आहेत, त्यात सरचिटणीसपदी विराजमान होणारे वरुण गांधी हे भाजपमधील सर्वात तरुण नेते आहेत. आजी, वडील आणि आईकडून त्यांना राजकीय वारसा मिळालेला आहे. पंतप्रधानपदी कोणत्या पक्षाने बसावे हे ठरवणा-या उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर जिल्हयाचे ते लोकसभेचे उमेदवार आहेत. २००९मध्ये ते उत्तर प्रदेशच्याच पिलीभित येथून लोकसभेवर निवडून गेले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सध्या देशभर प्रसारसभांचा सपाटा लावलेला आहे. मात्र, उत्तर प्रदेश तसेच इतर राज्यांत झालेल्या मोदींच्या प्रचारसभेत वरुण गांधी एकदाही उपस्थित राहिलेले नाहीत. गुजरातच्या तथाकथित विकासाबद्दल प्रसारमाध्यमे, भाजप नेते आणि स्तुतिपाठक मोदींवर मुक्तहस्ते स्तुतिसुमने उधळत आहेत. मात्र, वरुण गांधी यांनी त्याबद्दल चकार शब्द काढलेला नाही. त्यातच वरुण गांधी यांनी आपल्या चुलत भावांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव असा जाहीरपणे केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेस, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर एकत्रितपणे भाजपचा वैयक्तिक स्वरूपाचा हल्लाबोल सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर, वरुण गांधी यांच्या विधानामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. २००४मध्ये मनेका आणि वरुण गांधी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, हेसुद्धा विसरून चालणार नाही. देशी आणि परदेशी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले वरुण गांधी पक्ष, देशाची धोरणे आणि राजकारण याच्याबद्दल आघाडीच्या इंग्रजी वर्तमानपत्रांतून आपली मते मांडत आहेत. त्यामुळे पक्ष, धोरणे आणि राजकारण याच्याबद्दल त्यांचा एक स्थिर दृष्टिकोन बनलेला आहे आणि तो नाकारता येत नाही. वरुण यांनी राहुल यांच्या कार्याचा गौरव करणे, याबाबत राजकीय मतमतांतरे न मांडता ते एक वैयक्तिक स्वरूपाचे विधान होते, हे मान्य केले पाहिजे. अशा प्रकारच्या वैयक्तिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी या आधीही कित्येकदा दिलेल्या आहेत. महाराष्ट्रात मात्र उलटे चित्र दिसते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे या चुलत भावांमध्ये भाऊबंदकीचा वाद विकोपाला गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर, चांगल्याला चांगले म्हणण्याचे वरुण गांधी यांचे धारिष्टय त्यांची वैयक्तिक आणि राजकीय परिपक्वता दाखवून देते.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on