बिहारमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे राज्यातील दोन जण ठार झाले तर १७ जण जखमी झाले आहेत.
पाटणा – बिहारमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे राज्यातील दोन जण ठार झाले तर १७ जण जखमी झाले आहेत.
भूकंपामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भिंत तसेच छप्पर कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या. या विविध घटनांमध्ये दोन जण ठार तर १७ जण जखमी झाले. मृतांमध्ये एका आठ वर्षाचा मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे.
दरभंगा जिल्ह्यातील जखमी झालेल्या चार नागरिकांना दरभंगा वैद्यकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. तर मुंगेर जिल्ह्यातील ११ नागरिक यामध्ये जखमी झाले आहेत. या सर्वांवर सदार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर समस्तिपूर आणि भागलपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक नागरिक जखमी झाला आहे.
राज्यातील भूकंपग्रस्त जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारणा पथकाच्या पाच तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.