अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा आग्रा दौरा रद्द करण्यात आला आहे.
नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा आग्रा दौरा रद्द करण्यात आला आहे. २७ जानेवारीला ओबामा ताज महालला भेट न देता नवी दिल्लीहून सौदी अरेबियाला जाणार आहेत.
२५ जानेवारीपासून तीन दिवसांच्या भारत दौ-यावर येत आहेत. भारताच्या प्रजासत्ताक दिनी बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. आज संध्याकाळी ओबामा अमेरिकेहून भारताच्या दिशेने प्रयाण करतील.
या तीन दिवसांच्या दौै-यादरम्य़ान २७ जानेवारीला ओबामा त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्यासह आग्राच्या ताजमहालला भेट देणार होते. मात्र आग्रा दौरा रद्द कऱण्यात आल्याची माहिती शनिवारी अधिका-यांनी दिली. हा दौरा रद्द केल्याने २७ जानेवारीला लवकरच ओबामा सौदी अरेबियाच्या दिशेने निघणार आहेत. गुरुवारीच सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांचे निधन झाले.
ओबामांचा भारत दौरा