नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या अमेरिकन सागरी विभागाच्या हॅलिकॉप्टरचे अवशेष कालिनचौक भगवती मंदिराजवळच्या जंगलात सापडले आहेत.
काठमांडू – नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या अमेरिकन सागरी विभागाच्या हॅलिकॉप्टरचे अवशेष कालिनचौक भगवती मंदिराजवळच्या जंगलात सापडले आहेत.
भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी आलेले हे हॅलिकॉप्टर नेपाळच्या दालोखा जिल्ह्यातून मंगळवारपासून बेपत्ता झाले होते.
संरक्षण सचिव ईश्वरी पौडेल यांनी अवशेष सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या हॅलिकॉप्टरमध्ये अमेरिकन लष्कराचे सहा, नेपाळी लष्कराचे दोन असे एकूण आठ जवान होते.
नेपाळला मंगळवारी पुन्हा तीव्र भूकंपाचे मोठे धक्के बसल्यानंतर हे हॅलिकॉप्टर दालोखा जिल्ह्यामध्ये मदत आणि बचावकार्यासाठी गेले होते. तेव्हापासून या हॅलिकॉप्टरचा शोध सुरु होता. या हॅलिकॉप्टरचा काठमांडू विमानतळाशी दुपारी तीन वाजता शेवटचा संपर्क झाला होता.