९५ व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनाच्या पार्श्वभूमीवर १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान भव्य नाटय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव – ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनाच्या पार्श्वभूमीवर १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान भव्य नाटय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नाटय महोत्सवाचे उद्घाटन जे. एन. मेडिकल कॉलेजच्या जिरगे सभागृहात होणार आहे. उद्घाटन समारंभाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन समारंभानंतर भीम आणि हनुमान पपेट शो सादर केला जाणार आहे. याची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन मीना नाईक यांचे आहे. रात्री ९ वाजता मोहन जोशी आणि इतर कलाकारांचा सहभाग असलेले ‘सुखांत’ हे नाटक सादर केले जाणार आहे .
२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता ‘घेई छंद’ हा संगीत कार्यक्रम सादर केला जाणार आहे. राहुल देशपांडे, मंजुषा पाटील – कुलकर्णी आणि आनंद पाटील कार्यक्रम सादर करणार आहेत.
३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, जयंत घाटे, सुचेत गवई आणि ज्ञानदा पानसे यांचा सहभाग असलेला ‘त्या तिघींची गोष्ट’ हे नाटक सादर केले जाणार आहे.
५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता धम्माल विनोदी नाटक ‘सíकट हाउस’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. संजय नार्वेकर, भूषण कडू, मयुरा रानडे आणि हेमांगी वेलणकर हे कलाकार हा प्रयोग सादर करतील. बेळगाव शहरातील सी. पी. एड. मैदानावर शामियाना उभारण्याचे काम सुरू आहे.