स्मार्टफोन विक्रीमध्ये भारतीय बाजारपेठेत अव्वल स्थानी असलेल्या सँमसंगला भारतीय मोबाइल उत्पादक कंपनी मायक्रोमॅक्सने धक्का दिला आहे.
नवी दिल्ली- स्मार्टफोन विक्रीमध्ये भारतीय बाजारपेठेत अव्वल स्थानी असलेल्या सँमसंगला भारतीय मोबाइल उत्पादक कंपनी मायक्रोमॅक्सने धक्का दिला आहे. एका बाजारपेठ संशोधन करणा-या कंपनीच्या ताज्या अहवालानुसार २०१४च्या दुस-या तिमाहीत सँमसंगला मागे टाकत मायक्रोमॅक्सने अव्वल स्थान मिळवले आहे.
काउंटर पॉईट रिसर्च या कंपनीच्या अहवालानुसार भारतीय बाजारपेठेतील मोबाइल विक्रीतील सर्वाधिक १६.६ टक्के वाटा मायक्रोमॅक्सकडे आहे. तर इतके दिवस अव्वल स्थानी असलेले सँमसंग १४.४ टक्के वाट्यासह दुस-या स्थानावर आहे. बाजरपेठेतील वाट्यामध्ये नोकिया १०.९ टक्क्यांसह तिस-या तर कार्बन आणि लाव्हा हे अनुक्रमे ९.५ आमि ५.६ टक्क्यांसह चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
बाजारपेठेतील स्मार्टफोनच्या विक्रीचा विचार करता अद्याप सँमसंग २५.३ टक्क्यांसह अव्वल स्थानी आहे. तर १९.१ टक्क्यांसह मायक्रोमॅक्स दुस-या स्थानावर आहे. या यादीत कार्बन, मोटोरोला आणि नोकियाचा अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो.
तर मोटोरोलाने गेल्या तीन महिन्यात नऊ लाख ५५ हजार ६५० स्मार्टफोनची विक्री केली आहे. याच कालावधीमध्ये नोकियाने सहा लाख ३३ हजार ७२० फोनची विक्री केली आहे.
[EPSB]
मोटोरोलाची मुसंडी
आशियातील सर्वात वेगाने वाढणा-या भारतीय बाजारपेठेत मोटोरोलाने जोरदार मुसंडी मारली आहे.
[/EPSB]