महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकालाचे सुरुवातीचे कल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ तर, शिवसेना लहान भाऊ बनणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकालाचे सुरुवातीचे कल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ तर, शिवसेना लहान भाऊ बनणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मुंबईतही राज्यासारखीच स्थिती आहे. मुंबईतही शिवसेनेला लहान भावाची भूमिका वठवावी लागू शकते. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने मराठी विरुध्द गुजराती असा वाद निर्माण केला. मात्र त्याचा मतदारांवर काहीही परिणाम झालेला दिसत नाहीय.
मुंबईत भाजप १९ तर, शिवसेना १० जागांवर आघाडीवर आहे. मनसे तीन जागांवर आघाडीवर आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही मनसेला मुंबईत फटका बसताना दिसत आहे. सुरुवातीच्या काही फे-यांच्या मतमोजणीवरुन एकगठ्ठा मराठी मतदान शिवसेनेला झाल्याचे चित्र आहे. उलट शिवसेनेने मतांचे ध्रुवीकरण करण्याचा जो प्रयत्न केला त्याचा जास्त फायदा भाजपला झाला आहे.