अमेरिकन शाळेत दिल्या जाणा-या योग शिक्षणाला धार्मिकतेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न अमेरिन न्यायालयाच्या निर्णयामुळे फसला आहे.
कॅलिफोर्निया – अमेरिकन शाळेत दिल्या जाणा-या योग शिक्षणाला धार्मिकतेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न अमेरिन न्यायालयाच्या निर्णयामुळे फसला आहे.
कॅलिफोर्नियामधील काही योगशास्त्राच्या विरोधकांनी अमेरिकन शाळांमध्ये दिले जाणारे योग शिक्षणाचे धडे थांबवावेत यासाठी अमेरिकन न्यायालयात याचिका दाखल केली होती.
चौथ्या जिल्हा न्यायालयाच्या तीन सदस्यीय न्यायाधीशांनी सॅन दिएगो न्यायालयाचा निकाल कायम ठेवत योग शिक्षणाला धार्मिकतेशी जोडण्यास नकार दिला.
योग शिक्षण धर्मनिरपेक्ष असून, त्याचा धार्मिकतेशी काहीही संबंध नाही. शाळांना धार्मिकतेच्या वादात ओढू नये असे तीन सदस्यीय न्यायाधीशांनी आपल्या निकालात म्हटले आहे.
अमेरिकन शाळांमध्ये दिल्या जाणा-या योग शिक्षणा विरोधात काही पालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. योगासनांच्या आडून हिंदुत्वाचा प्रचार होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. खालच्या न्यायालयात निकाल विरोधात गेल्यानंतर त्यांनी वरच्या न्यायालयात अपील केले होते. मात्र तेथेही या पालकांच्या पदरी निराशा आली आहे.