>> रात्री शांत झोप येण्यासाठी
>> झोपताना पाय दक्षिणेला किंवा पूर्वेला करू नये.
>> झोपताना पाय उत्तरेला किंवा पश्चिमेला करावे.
>> बेडसमोर आरसा येऊ देऊ नये.
>> लालभडक रंगाची चादर किंवा बेडशीट वापरू नये.
>> बेड चौकोनी किंवा आयताकृती असावा.
>> बेडखाली स्टोरेज नसावे.
>> झोपताना मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर बेडच्या जवळ नसावे.
>> झोपताना टीव्ही झाकून ठेवावा.
>> बेडच्या खाली कागदी कपामध्ये खडे मीठ ठेवावे ते दर १५ दिवसांनी बदलावे.
>> झोपण्याच्या आधी देवाचे नामस्मरण करून झोपावे म्हणजे शांत झोप लागते.
( रोजची शांत झोप हे आरोग्याचे चांगले लक्षण आहे )
मुलांच्या अभ्यासासाठी
>> मुलांना अभ्यासाला बसवताना पूर्वेला किंवाउत्तरेला तोंड करून बसवावे.
>> मुलांनी झोपताना पूर्वेला डोके व पश्चिमेला पाय करावे.
>> मुलांची अभ्यासाची खोली ईशान्य दिशेला असावी.
>> मुलांच्या खोलीमध्ये भडक लाल, भडक काळा अशा भडक रंगाचा वापर करू नये.
>> मुलांनी बंक बेड वर झोपू नये.
>> मुलांच्या बेडरूमला शक्यतो, पूर्वेला व उत्तरेला खिडक्या असणे केव्हाही चांगले.
>> मुलांची कपाटे उत्तर किंवा पूर्व मुखी असावी.
>> मुलांच्या अभ्यासिकेमध्ये किंवा बेडरूममध्ये जास्त अडगळ भंगार, जास्त वजनी कपाटे ठेवू नये.
( मुलांची झोपण्याची जागा योग्य असेल तर त्यांचे आरोग्य चांगले राहू शकते)