दादरमधील अमरहिंद मंडळाच्या ६५व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शालेय क्रीडा स्पर्धात लंगडीत मुलांमध्ये परळचा सोशल सव्र्हिस लीग तसेच मुलींमध्ये दादरचा मॉडर्न इंग्लिश हायस्कूलचा संघ अजिंक्य ठरला.
मुंबई – दादरमधील अमरहिंद मंडळाच्या ६५व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शालेय क्रीडा स्पर्धात लंगडीत मुलांमध्ये परळचा सोशल सव्र्हिस लीग तसेच मुलींमध्ये दादरचा मॉडर्न इंग्लिश हायस्कूलचा संघ अजिंक्य ठरला.
अंतिम फेरीत मुलांमध्ये सोशल सव्र्हिस लीगने कांदिवलीच्या नरवणे विद्यालयाचा तसेच मॉडर्न इंग्लिश हायस्कूलने परळच्या शिरोडकर हायस्कूलवर विजय मिळवला.
मुलांमध्ये सोशलचा प्रसाद डांगे तसेच मॉडर्नची साक्षी पिळणकर सवरेत्कृष्ट ठरली. सवरेत्कृष्ट संरक्षक म्हणून आदित्य शिंदे (सोशल) आणि सिद्धी हरमळकर (मॉडर्न) तसेच सवरेत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून विशाल बर्फे (नरवणे) आणि स्मृती पाटीलला (शिरोडकर) गौरवण्यात आले.