Saturday, June 1, 2024
Google search engine
Homeमध्यंतरवास्तू वेधविकासकांचा साईड बिझनेस ‘पीजी’ व्यवसाय

विकासकांचा साईड बिझनेस ‘पीजी’ व्यवसाय

‘पीजी’मध्ये राहायला येणा-या लोकांकडून एक महिना भाडे, एक महिना डिपॉझिट अशी रक्कम घेतली जाते. शिवाय एक महिन्याचे भाडे ब्रोकरेज म्हणून घेतले जाते. ते एजंटला जाते. पण, विकासकाला किंवा सदनिका मालकाला दोन महिन्यांचे भाडे मिळते.

मुंबईत चरितार्थासाठी, नोकरी धंद्यासाठी म्हणून येणारांचा ओघ सतत असतो. परंतु, मुंबईत यायला काही कोणाची हरकत नसते पण, प्रश्न असतो तो मुंबईत राहायचे कुठे याचा. मुंबईत असंख्य टॉवर, इमारती, बिल्डिंग, चाळी तयार होत असतात. यात अधिकृत-अनधिकृत बांधकामेही खूप असतात. त्यामुळे अशा ठिकाणी नेमके कुठे राहायचे असा प्रश्न बाहेरून आलेल्यांना पडत असतो. अशांसाठी विकासकांनीच आपल्या एजंटमार्फत सुरू केलेला आणि गेल्या ५ वर्षात जोरात विकसित झालेला व्यवसाय म्हणजे पीजी अर्थात पेइंग गेस्ट व्यवसाय.

कोसळलेली अर्थव्यवस्था, विकासकांच्या पडून राहिलेल्या सदनिका यामुळे एक मोठी अर्थव्यवस्था ब्लॉक झालेली आहे. एका टॉवरमध्ये चाळीस सदनिका असतील आणि त्यातील ३० सदनिका विकल्या गेल्या आणि दहा सदनिका शिल्लक राहिल्या असतील, तर त्या दहा सदनिकांचे पैसे अडकून पडतात. विकासकाचा पैसा ब्लॉक होतो. त्यामुळे नवा प्रोजेक्ट अडकून पडतो. ही अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी रोटेशनला पैसा मोकळा होणे गरजेचे असते. त्यासाठी बहुतेक विकासकांनी आता पीजी अर्थात पेइंग गेस्ट ठेवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरातून विरार ते चर्नीरोड आणि मध्य रेल्वेमार्गावरील कल्याण ते दादर तसेच हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान शेकडो विकासकांनी आपल्या टॉवरमधील अनेक सदनिका या पीजी व्यवसायासाठी दिलेल्या आहेत. यामध्ये दराप्रमाणे जास्तीत जास्त सुविधा देऊन कमी जागेत चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे सेकंड होमप्रमाणे पीजी व्यवसायासाठी सदनिका खरेदी करण्याचाही कल वाढलेला आहे. विकासक सेकंड होमप्रमाणे पीजी बिझनेससाठी सदनिका उपलब्ध करून देऊन आपला पैसा मोकळा करताना दिसत आहेत.

पीजीमध्ये राहायला येणा-या लोकांकडून एक महिना भाडे, एक महिना डिपॉझिट अशी रक्कम घेतली जाते. शिवाय एक महिन्याचे भाडे ब्रोकरेज म्हणून घेतले जाते. ते एजंटला जाते. पण, विकासकाला किंवा सदनिका मालकाला दोन महिन्यांचे भाडे मिळते. एका फ्लॅटमध्ये कमीतकमी ६ ते प्लॅटच्या आकारानुसार ८ ते १० बेड टाकून जागा राहायला दिली जाते. यामध्ये प्रत्येकाला स्वतंत्र कपाट, वायफाय, गीझर गरम पाणी, किचन आणि हॉल कॉमन वापरासाठी, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, इस्त्री, मिक्सर, टीव्ही, फ्रीज अशा सर्व अ‍ॅमिनीटीज दिल्या जातात. त्याचप्रमाणे पार्किंगची व्यवस्था असते. त्यामुळे बाहेरून आलेला नोकरदार अगदी राजीखुशीने पैसे देऊन आनंदात राहतो. अनेक ठिकाणी सफाईसाठी स्वतंत्र व्यवस्था असते आणि केअरटेकरही ठेवलेला असतो. हा केअरटेकर जेवण, चहा, नाष्टय़ाचीही सोय करतो. त्यामुळे सगळे काही एकाच ठिकाणी उपलब्ध होते.

मुंबईत येणा-या आयटी सेक्टर, कॉलसेंटर, मल्टीनॅशनल कंपन्या आणि अन्य खासगी सरकारी नोकरदारांना ही पीजी व्यवसायाची सुविधा म्हणजे वरदान ठरते आहे. पश्चिम उपनगरात बोरिवली ते दादर या भागात पीजीचे दर जास्त आहेत. मध्य मुंबई उपनगरात भांडुप, पवई, कांजूरमार्ग आणि मुलुंडमधील दर जास्त आहेत. तर नवी मुंबईतील नेरुळ, जुईनगर, कामोठे या भागात स्वस्त दरात पीजी उपलब्ध होतात.

विकासक आपल्या काही सदनिका काही व्यवसायिक एजंट अथवा कंपन्यांना तीन ते पाच वर्षाच्या कराराने भाडय़ाने देतात. त्यापोटी डिपॉझिट आणि काही रक्कम आगाऊ घेतली जाते. त्या सदनिकेत तो एजंट अनेक पीजी ठेवून दुप्पट कमाई करतो. ८०० चौरस फुटांचा एक ३ बीएचके फ्लॅट २५ हजार रुपये भाडय़ाने घेतला, तर त्या सदनिकेतील ३ बेडरूममध्ये प्रत्येकी ३ आणि हॉलमध्ये ४ असे पीजी ठेवले, तर १३ जणांची राहण्याची सोय होते. प्रत्येकाकडून महिना ५ हजार घेतले, तर साठ ते पासष्ठ हजार रुपये मिळकत होते. त्यातील २५ हजार गेले आणि लाईट व इतर खर्च गेला, तर महिना ३५ हजार रुपये उत्पन्न एका सदनिकेतून मिळवले जाते. असे सदनिकेच्या दर्जानुसार कमी जास्त दर ठरतात. पण, यामुळे विकासकाला दरमहा सदनिकांचे भाडे आणि डिपॉझिट मिळत असल्यामुळे त्याचा अडकलेला पैसा वसूल होतो.

भांडुपची ड्रीम्स सोसायटी, ठाण्यातील कळवा, वर्तकनगर भाग आणि मालाडमधील एव्हरशाईनगर या भागात मेट्रो ट्रेनच्या कामासाठी आलेले बाहेरगावचे इंजिनीअर, मॉल आणि मल्टिनॅशनल कंपन्यांमधील कर्मचारी यांचा मोठा राबता असल्यामुळे त्यांना याचा फायदा होतो.

पीजी व्यवसायासाठी अनेकांनी साईटही काढलेल्या आहेत. या संकेतस्थळावरून तुम्ही भारताच्या कानाकोप-यातून कुठूनही पीजी बुक करून अचानक राहायला येऊ शकता. मॅजिक ब्रिक, सुलेख, नो ब्रोकर अशा अनेक संकेतस्थळांमार्फत अशा एजंट आणि विकासकांशी संपर्क साधून आपला मुंबईतील राहण्याचा प्रश्न सोडवता येतो.

दरपत्रक
>> ठाणे     ५०००
>> मुलुंड     ६०००
>> भांडुप     ६५००
>> पवई     १००००
>> मालाड     ८०००
>> बोरिवली     ५०००
>> कांदिवली     ६०००
>> दादर     १००००
>> बांद्रा     १००००
>> गिरगांव चर्नी रोड ८०००
>> नेरूळ     ४०००
>> कामोठे     ४०००
>> जुईनगर     ३०००
>> कळवा     ३०००
>> डोंबिवली     ४०००
>> कल्याण     ३५००

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट