विक्रोळीमधील सिद्धार्थ नगर परिसरातील एसआरए योजनेतील एका सातमजली रहिवाशी इमारतीला सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली.
मुंबई – विक्रोळी (पूर्व) सिद्धार्थनगर येथील सात मजली इमारतीला सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू तर १४ जण जखमी झाले. शीवच्या लोकमान्य टिळक आणि घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.
विक्रोळी पार्क साईट परिसरात कैलास कॉम्प्लेक्स या एसआरए इमारतीच्या मीटर बॉक्सला सोमवारी पहाटे ३ वाजता आग लागली. हळूहळू ही आग सातव्या माळ्यापर्यंत पसरत गेली. फ्लॅट क्र. ७०८च्या दरवाजाला आग लागल्याने सिल्वन कुटुंबीय अडकून पडले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयातील गौतम, पौर्णिमा, विशाल, अयुष आदींचा गुदमरून मृत्यू झाला.
पाच आणि सहाव्या मजल्यावरील रहिवाशांना स्थानिक नागरिकांनी तर सातव्या मजल्यावरील रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली.
दुर्घटनेतील मृतांची नावे
गौतम शिगवण (५५)
पूर्णिमा शिगवण (५०)
विशाल शिगवण (२५) ट
आयुष शारदुल (५)
जखमींची नावे
विकास शिगवण (२६)
गुणाजी यादव (६७)
सिध्देश पाटकर (२३)
बाळकृष्ण आंबोली (४५)
राहुल इंगळे (३१)
वनिता आंबोले (४५)