विराट कोहलीचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता त्याला हाताळायला, मार्गदर्शन करायला कठोर प्रशिक्षक हवा असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली – भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता त्याला हाताळायला, मार्गदर्शन करायला कठोर प्रशिक्षक हवा असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांनी व्यक्त केले आहे.
विराटचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता त्याला हाताळायला, मार्गदर्शन करायला चांगला प्रशिक्षक हवा. प्रशिक्षक असा हवा जो त्याचा स्वभाव आणि वर्तनावर नियंत्रण आणू शकेल. विराट अविचारी असून त्याने आपल्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे.
क्रिकेट हा कबड्डी किंवा खो-खो नाही. तुम्हाला दीर्घकाळ खेळायचे असेल तर, तुमचे तुमच्या स्वभावावर नियंत्रण असणे आवश्यक आहे असे बेदी म्हणाले. प्रसारमाध्यमांच्या काही गटांकडून कोहलीच्या आक्रमक वर्तनाचे जे समर्थन केले जाते त्यावरही बेदी यांनी नाराजी व्यक्त केली.
कोहलीला प्रचंड काळजी घेण्याची गरज आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असते. रवी शास्त्री, सौरव गांगुली कोहलीकडे ज्या दृष्टीकोनातून बघतात त्यापेक्षा वेगळया दृष्टीकोनातून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड त्याच्याकडे पाहत असावेत. क्रिकेट हा खेळ तुम्हाला चांगली मुल्ये, विनम्रता शिकवतो असे बेदी म्हणाले.