पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या श्रीलंकन दौ-यानंतर शनिवारी श्रीलंकन नौसेनेकडून भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली.
कोलंबो – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या श्रीलंकन दौ-यानंतर शनिवारी श्रीलंकन नौसेनेकडून भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली. कनकेसंतुराय आणि तालैमन्नार येथे अवैध मासेमारी केल्याप्रकरणी श्रीलंकेकडून ५४ भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री कनकेसंतुराय येथून २१ मच्छिमार आणि पाच बोटी ताब्यात घेण्यात आल्या तर तालैमन्नार येथून ३३ मच्छिमार आणि इतर पाच बोटी ताब्यात घेण्यात आल्याचे श्रीलंकन नौदल प्रवक्त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेचा दौरा केला होता. या दौ-याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेकडून ८६ मच्छिमारांची सुटका करण्यात आली होती.