दिंडोशी येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तीन फरार आरोपींना रविवारी मध्यरात्री अटक केली. हे तीनही आरोपी अल्पवयीन आहेत.
मुंबई- दिंडोशी येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तीन फरार आरोपींना रविवारी मध्यरात्री अटक केली. हे तीनही आरोपी अल्पवयीन असून त्यांना साकीनाका परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे.
गोरेगाव येथे राहणा-या १६ वर्षीय मुलीवर एक नोव्हेंबर रोजी सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. दिवाळीच्या शुभेच्छा देण्याकरता ही मुलगी आपल्या मित्राकडे गेली होती.
यावेळी मुलीला तिच्या मित्रांनी शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिला दिंडोशी येथील नागरीक निवारा या परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. मात्र या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या अन्य तीन आरोपींचा पोलिस शोध घेत होते.
[EPSB]
दिवाळीत मुंबईत सामुहिक बलात्कार
गोरेगाव पूर्व येथील ओळखीच्या मुलीला दिवाळीनिमित्त घरी बोलवून तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन चार जणांनी बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार दिंडोशी येथे घडला.
गोरेगाव सामूहिक बलात्कार, तिघांना अटक
दिवाळीच्या मुहूर्तावर गोरेगावमध्ये सोळावर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारा प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी तीन आरोपींना अटक केली.
[/EPSB]