भारतीय महिलांबाबत नुकतीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगात सर्वाधिक धूम्रपान करण्यांमध्ये भारतीय महिला दुस-या स्थानावर आहेत.
लंडन – भारतीय महिलांबाबत नुकतीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगात सर्वाधिक धूम्रपान करण्यांमध्ये भारतीय महिला दुस-या स्थानावर आहेत. सर्वाधिक धूम्रपान करणा-या महिलांची संख्या अमेरिकेत सर्वात जास्त आहे तर त्यापाठोपाठ नंबर लागतो तो भारतीय महिलांचा. हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन(आयएचएमई) ने केलेल्या संशोधनात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
‘आयएचएमई’च्या पहाणीनुसार, १९८० मध्ये ७२१ दशलक्ष लोक धूम्रपान करत होते तर हीच संख्या २०१२ मध्ये ९६७ दशलक्षापर्यंत पोहोचली. सध्या भारतात धूम्रपान करणा-या महिलांचे प्रमाण १२.१ कोटी इतकी आहे. गेल्या तीन दशकांमध्ये धूम्रपान करणा-या महिलांचे प्रमाण ३.२ टक्क्यांनी वाढत आहे. मात्र त्या तुलनेत धूम्रपान करणा-या पुरुषाच्या संख्या कमी होत आहे. संपूर्ण अहवालात सिगारेट ओढणा-यांची संख्या जरी वाढत असल्याचे दिसत असले तरी धूम्रपान करणा-यांमध्ये पुरुषांचे प्रमाण कमी होत आहे. याचवेळी महिलांचे धूम्रपानाचे वाढते प्रमाण ही धोकादायक बाब आहे.
२०१२ मध्ये करण्यात आलेल्या संशोधनात ७५ देशांमधील लोक दिवसाला २० सिगारेट ओढतात तर हेच प्रमाण भारतामध्ये आठ सिगारेट इतके आहे. भारतात तंबाखू सेवनाने दरवर्षी सुमारे दहा हजार लाख लोकांचा मृ्त्यू होतो असे या अभ्यासादरम्यान दिसून आले आहे.