कुडाळ येथे स्थापन करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी विधीवत पूजा करून करण्यात आली.
कुडाळ- कुडाळ येथे स्थापन करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी विधीवत पूजा करून करण्यात आली.
कुडाळ पोस्ट कार्यालयाजवळ काँग्रेस कार्यालयासमोर प्रतिवर्षाप्रमाणे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना केली जाते. या वर्षी विधीवत पूजेने माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. राजाच्या दरबारात सकाळपासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
या वेळी जि. प. अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते, तालुकाध्यक्ष प्रकाश मोर्ये, जि. प. सदस्य रणजित देसाई, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी सभापती सुनील भोगटे, कुडाळ उपसरपंच विनायक राणे, तालुका उपाध्यक्ष रूपेश पावसकर, लोकसभा युवक अध्यक्ष सनी कुडाळकर, युवक जिल्हा सरचिटणीस संजू परब, कुडाळ विधानसभा अध्यक्ष आनंद शिरवलकर, साईनाथ म्हाडदळकर, ग्रा. पं. सदस्य राकेश नेमळेकर, सिध्देश बांदेकर, युवक शहर अध्यक्ष सुनील बांदेकर, सेवादलचे भाई साटम, भूषण राणे, नागेश नेमळेकर, मिलिंद नाईक आदी पदाधिकारी, भक्तगण उपस्थित होते.