अभिनेता सैफ अली खान (२०१०) आणि उद्योगपती अरुण फिरोदिया (२०१२) यांना पद्म पुरस्कार देण्यासाठी आवश्यक असलेल्या मंजुरी देणा-या गुप्तचर अधिका-यांवर कोणती कारवाई केली, असे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने केंद्रीय गृहखात्याला दिले आहेत.
नवी दिल्ली – अभिनेता सैफ अली खान (२०१०) आणि उद्योगपती अरुण फिरोदिया (२०१२) यांना पद्म पुरस्कार देण्यासाठी आवश्यक असलेल्या मंजुरी देणा-या गुप्तचर अधिका-यांवर कोणती कारवाई केली, असे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने केंद्रीय गृहखात्याला दिले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी माहिती आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेनुसार, सैफ अली खान व फिरोदिया यांना पद्म पुरस्कार देण्यासाठी गुप्तचर संस्थांनी हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, या दोघांची पद्मश्रीसाठी निवड करताना गुप्तचर संस्थांनी पुरेशी चौकशी केली नसल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला. त्यामुळे पुरेशी चौकशी न करता शिफारस करणा-या गुप्तचर संस्थेच्या विरोधात कोणती कारवाई केली, असा सवाल अग्रवाल यांनी विचारला आहे.
माहिती आयुक्त सुधीर भार्गव यांनी केंद्रीय गृहखात्याला आदेश देताना सांगितले की, २०१४ मध्ये पद्म पुरस्कार देताना पंतप्रधान कार्यालय किंवा अन्य सार्वजनिक संस्थांनी आक्षेप घेतला होता का? याची माहिती द्यावी. २०१५ मध्ये दिलेल्या पद्म पुरस्काराच्या शिफारशींची माहिती उघड करण्याचे आदेश त्यांनी दिले.