ऑस्ट्रेलियातील ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी महिला हरिंदर सिंधू यांची गुरुवारी भारतात उच्चायुक्तपदी नेमणूक करण्यात आली. सिंधू या भारतीय वंशाच्या दुस-या उच्चायुक्त आहेत.
मेलबर्न – ऑस्ट्रेलियातील ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी महिला हरिंदर सिंधू यांची गुरुवारी भारतात उच्चायुक्तपदी नेमणूक करण्यात आली. सिंधू या भारतीय वंशाच्या दुस-या उच्चायुक्त आहेत.
सिंधू या मूळच्या पंजाबच्या आहेत. यापूर्वी २००९ ते २०१२ मध्ये पीटर वर्गीस यांनी ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त म्हणून कामकाज पाहिले होते.
भारताचे उच्चायुक्त पद भूषवणे ही अभिमानाची गोष्ट आहे. भारताचे भविष्य आर्थिकदृष्टय़ा उज्ज्वल आहे. वैयक्तिक पातळीवर मला भारताचे उच्चायुक्त पद मिळाल्याचा अभिमान आहे. यामुळे भारताच्या सांस्कृतिक वारशाचा मला अतिशय सूक्ष्म अभ्यास करता येईल. तसेच भारतातील विविधता आणि इतिहास याबद्दल ही मला जाणून घेता येईल, असे त्या म्हणाल्या.