‘हार्वर्ड विद्यापीठ’ या अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठाने ६० कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली.
न्यूयॉर्क- ‘हार्वर्ड विद्यापीठ’ या अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठाने ६० कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली. विद्यापीठात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या ‘इंट्रोडक्शन टू काँग्रेस’ या अभ्यासक्रमाच्या परीक्षेला बसलेल्या बहुतेक विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचे समोर आल्याने विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.
या प्रकरणी तब्बल १२५ विद्यार्थ्यांची चौकशी सुरू असून, त्यांच्यावरही कठोर कारवाई होणार आहे. या परीक्षेला २७९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी निम्म्या विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचे समोर आले आहे. अनेक विद्यार्थ्यांची उत्तरे समान आढळली.