पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी हिमायत बेगला मुंबई उच्च न्यायालयाने फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मुंबई- पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी हिमायत बेगला मुंबई उच्च न्यायालयाने फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
हिमायत बेगवर एकूण नऊ आरोप होते. मात्र आरोप सिद्ध न झाल्याने न्यायालयाने मिर्झा हिमायत इनायत बेगची बॉम्बस्फोटासह आठ प्रकरणातून सुटका केली. मात्र घरात स्फोटके मिळाल्याच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
१३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जण ठार तर ५८ जण जखमी झाले होते. यात अनेक परदेशी नागरिकांचा समावेश होता.
याप्रकरणी दहशवादविराधी पथकाने (एटीएस) इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी असलेल्या हिमायत बेगला ७ सप्टेंबर २०१० रोजी बीडमधील उदगीर येथून अटक केली होती. त्यावेळी त्याच्या घरातून १२०० किलो शस्त्रसाठा जप्त केला होता.
२०१३ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने बेगला बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला हिमायतने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
त्यावर न्यायमूर्ती नरेश पाटील व न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून हिमायतला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
[EPSB]
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी बेग दोषी
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवादी हिमायत बेग याला पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट- दहशतवादी अटकेत
पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी इंडियन मुजाहिदीनच्या एका संशयित दहशतवाद्यास कोलकाता पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केले.
[/EPSB]