शौर्य, उल्लेखनीय सेवा बजावल्याप्रकरणी निमलष्करी दल आणि पोलिस दलातील ९१९ जणांना पदके जाहीर झाली आहेत.
नवी दिल्ली- राजपूत रेजिमेंटचे मेजर मुकुंद वरदराजन यांना मरणोत्तर अशोकचक्र जाहीर झाले आहे. शौर्य, उल्लेखनीय सेवा बजावल्याप्रकरणी निमलष्करी दल आणि पोलिस दलातील ९१९ जणांना पदके जाहीर झाली. यामध्ये महाराष्ट्रातील ४० पोलिसांना समावेश आहे. राष्ट्रपतींचे उल्लेखनीय सेवेबद्दलचे पदक ८२ जणांना जाहीर झाले.
राष्ट्रपतींचे शौर्यपदक १५ जणांना, पोलिस शौर्य पदक १६३ जणांना तर राष्ट्रपतींचे उल्लेखनीय सेवेबद्दलचे पदक ८२ जणांना जाहीर झाले. तसेच उल्लेखनीय सेवेबद्दलचे पदक ६५९ जणांना मिळाले आहे.
राष्ट्रपतीशौर्य पदक
– पोलिस नाईक गोविंदा फरकडे(मरणोत्तर)
-पोलिस नाईक शागीर शेख
– पोलिस नाईक पंकज गोडसेलवार
शौर्य पोलिस पदके
-पोलिस शिपाई मुन्शी पुंघाती(मरणोत्तर)
– पोलिस नाईक शामादास उल्के
– पोलिस नाईक सर्जु वेलाडी
– पोलिस नाईक व्यंकटेश मुंगीवार
-पोलिस नाईक वासुदेव मडवी
– पोलिस शिपाई पवन अर्का
– पोलिस नाईक विजय सल्लाम
-पोलिस नाईक रवीकुमार गंधाम
-पोलिस नाईक सुर्यकांत अत्राम
– पोलिस उपनिरीक्षक दिगंबर पाटील
– पोलिस नाईक बन्नू हलमी
– पोलिस नाईक नागेश टकम
– पोलिस नाईक येशु तुलावी
-पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाघ
– पोलिस उपनिरीक्षक नितीन बडगुजर
– पोलिस हवलदार भय्याजी कुलसांगे
– पोलिस उपनिरीक्षक संभाजी गुरव
– पोलिस नाईक भजनराव गावडे
-पोलिस शिपाई कुमारसहा उसेंदी
उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदके प्राप्त झालेले अधिकारी :
– अतिरिक्त महासंचालक प्रभात रंजन, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
– सहाय्यक पोलिस आयुक्त जनार्दन ठोकळ, सशस्त्र पोलिस दल, नायगाव
– सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिलीप घाग, विशेष शाखा, मुंबई
राज्यातील ४० पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदके
– अतिरिक्त पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, मुंबई
– सहाय्यक उपनिरीक्षक अर्जुन सुतार, एमआरए मार्ग पोलिस ठाणे
– सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भूमकर, मलबारहिल पोलिस ठाणे
– सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आनंद चोरगे, जुहू पोलिस ठाणे
– सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, एसीबी, मुंबई