पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत अंदाधुंद गोळीबार केला आहे.
जम्मू- पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मेंढर क्षेत्रात हा हल्ला केला.
पाकिस्तानने गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर एका घराचे मोठे नुकसान झाले आहे.
याव्यतिरिक्त रात्री कुपवाडा जिल्ह्यातल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.
कुपवाडा जिल्ह्यातल्या कालारुस भागातल्या वनक्षेत्रात असलेल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हा हल्ला चढवला. दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी चांगलाच प्रतिकार केला. यात लष्कराचा एक जवान जखमी झाला.
J&K: Terrorists attacked 41 RR Army HQ in forest area of Kalaroos in Kupwara district, late last night; soldier injured. Search ops on. pic.twitter.com/KTSd1OiATM
— ANI (@ANI)