कर्नाटकमधील बिदर येथे झालेल्या कार अपघातमुंबईचे पाचजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी आहे.
कर्नाटक- कर्नाटकमधील बिदर येथे झालेल्या कार अपघातमुंबईचे पाचजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग ९ वर शनिवारी सकाळच्या सुमारास झाला. अपघातातील सर्वजण मुंबईतील रहिवासी असल्याचे समजते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून हैदराबादच्या दिशेने जात असलेल्या कारला बिदर येथे बसवकल्याण येथे ट्रकची जोरदार धडक बसली. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला आपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात मृत्यू झालेले सर्वजण मुंबईचे रहिवाशी असून त्यांची नावे अद्यापही समजू शकलेली नाहीत.