पुण्यात दिवसेंदिवस हत्येच्या घटना वाढतच चालल्या असून सोमवारी पुण्यातील बाणेरमध्ये धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाचा खून करण्यात आला.
पुणे- पुण्यात दिवसेंदिवस हत्येच्या घटना वाढतच चालल्या असून सोमवारी पुण्यातील बाणेरमध्ये धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाचा खून करण्यात आला. हल्ल्यानंतर अज्ञात व्यक्ती फरार झाली. ही घटना सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
अफसर खान (२०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या हल्ल्यात सलीम सय्यद हा जखमी झाला आहे. त्याच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोघेही मित्र आहेत.
बाणेर रोडवरील सकाळनगर बसस्टॉपजवळ अज्ञात व्यक्ती आणि अफसर यांच्यामध्ये बघण्यावरून किरकोळ वाद झाला होता. त्या अज्ञात व्यक्तीने रागाच्या भरात अफसरवर कुकरीने जोरदार वार करून त्याची हत्या केली. त्याचा मित्र सलीम सय्यद यावरही वार केले. यामध्ये सलीम गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हल्ला केल्यानंतर अज्ञात हल्लेखोर पसार झाला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास चतुःश्रूंगी पोलीस करीत आहेत.