प्रत्येकाला आपल्यासाठी एक आलिशान घर हवे असते. पण जर लोक तुम्हालाच तुमच्या घरामुळे ओळखायला लागले तर..? जगभरात अशीच काही घरे आहेत, ज्यामुळे त्यांच्या मालकांची ओळख होते.
वॉशिंग्टन- प्रत्येकाला आपल्यासाठी एक आलिशान घर हवे असते. पण जर लोक तुम्हालाच तुमच्या घरामुळे ओळखायला लागले तर..? जगभरात अशीच काही घरे आहेत, ज्यामुळे त्यांच्या मालकांची ओळख होते. हे एवढे वेगळे आहेत की, पाहणारा यांची स्तुती केल्याशिवाय राहात नाही. पण तुम्हाला जर वाटत असेल की, हे त्यांच्या भव्यतेमुळे असेल, तर १ मीटर स्क्वेअर असे या घराचे नाव आहे.
वास्तवातही हे घर १ मीटर स्क्वेअरचेच आहे. जगातील हे सर्वात छोटे शहर कुठेही घेऊन जाता येऊ शकते. यामध्ये ऑफिसचे काम करण्यासाठी एक छोटा टेबल आणि खुर्ची देखील आहे. तसेच झोपण्यासाठी फ्लिपही करता येऊ शकते. १९ हजार रुपये किंमत असलेले (२५० पाउंड) हे घर एखाद्या फोन बुथसारखे वाटते. याला आरामदायक तर म्हणता येणार नाही, पण यामध्ये राहून लोक वेगळा अनुभव घेऊ शकतात.
[EPSB]
[/EPSB]